Platinum Vs Gold: अवघ्या सातच दिवसांत 15 टक्के नफा; 2026 मध्ये सोने नाही तर ‘या’ मौल्यवान धातूने मारली बाजी

अवघ्या सात दिवसांत या धातूच्या दरात 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, नफा वसुलीच्या काळातही त्याने इतर मौल्यवान धातूंना मागे टाकले आहे.
Platinum Vs Gold: अवघ्या सातच दिवसांत 15 टक्के  नफा;  2026 मध्ये सोने नाही तर ‘या’ मौल्यवान धातूने मारली बाजी

नवी दिल्ली: वर्ष 2025 मध्ये सोने – चांदीने किमतींचे सर्व विक्रम मोडीत काढत ऐतिहासिक झेप घेतली होती. मात्र, 2026 च्या सुरुवातीलाच या मौल्यवान धातूंच्या किमतींना घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने – चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता एका वेगळ्या धातूने वेधून घेतले आहे. तो धातू म्हणजे प्लॅटिनम. सध्या बाजारात सोन्यापेक्षा प्लॅटिनमची ‘चमक’ अधिक गडद होताना दिसत आहे.

गेल्या वर्षाचा आढावा घेतला तर सोने आणि चांदीने गुंतवणुकीवर भरघोस परतावा दिला आहे. 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत 70 टक्के वाढ झाली, तर चांदीने तब्बल 160 टक्क्यांहून अधिक परतावा देऊन सर्वांनाच चकित केले. याच काळात प्लॅटिनमनेही 140 टक्के दमदार वाढ नोंदवली होती. परंतु, 2026 च्या पहिल्या सात दिवसांत चित्र बदलले असून, सोने – चांदीच्या तुलनेत प्लॅटिनमने गुंतवणूकदारांच्या पदरात मोठा नफा टाकला आहे.

हेही वाचा: Ruturaj Gaikwad Record: ऋतुराज गायकवाडचा ऐतिहासिक पराक्रम; मायकेल बेवनचा 22 वर्षांपूर्वीचा 'हा' विश्वविक्रम काढला मोडीत

आकडेवारीवर नजर टाकल्यास, 31 डिसेंबर रोजी प्लॅटिनमचा दर 58,410 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो 7 जानेवारीपर्यंत 67,530 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या सात दिवसांत प्लॅटिनमने सुमारे 15.60 टक्के वाढ नोंदवली आहे. याच काळात सोन्यात केवळ 2 टक्के आणि चांदीत आठ टक्के वाढ झाली. तुलनेचा विचार करता, प्लॅटिनमने सोन्यापेक्षा सात पट जास्त, तर चांदीच्या तुलनेत दुप्पट परतावा देऊन 2026 च्या सुरुवातीलाच बाजी मारली आहे.

आंतरराष्ट्रीय राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठेत सोने – चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठला होता. मात्र, आता गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर नफा वसुली (Profit Booking) होत असल्याने या धातूंच्या किमतीत काहीशी घट किंवा स्थिरता जाणवत आहे. बुधवारी MCX वर सोन्याचे दर 0.5 टक्क्याने घसरले, तर चांदी 1.5 टक्क्याने स्वस्त झाली. प्लॅटिनममध्ये मात्र 6 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली, जी बाजारातील बदलत्या प्रवाहाचे संकेत देत आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्लॅटिनमची ही घौडदौड येणाऱ्या काळातही कायम राहू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे औद्योगिक क्षेत्रातून वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत असलेला कमी पुरवठा. जरी सध्या सोने – चांदीत नफा वसुली सुरू असली, तरी आगामी काही महिन्यांत हे धातू पुन्हा एकदा उसळी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास तरी, 2026 च्या पहिल्या आठवड्यात प्लॅटिनमने गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले आहे.

हेही वाचा: Toxic Movie Teaser: 'KGF' नंतर 'Toxic' चा धुमाकूळ; 'Toxic' मध्ये दिसणार यशचा निर्दयी अवतार, टीझर पाहूनच अंगावर येईल काटा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version