वसईत सापडला प्लास्टीकचा तांदूळ; तांदळामुळे सुरू झाली पोटदुखी

वसईत सापडला प्लास्टीकचा तांदूळ; तांदळामुळे सुरू झाली पोटदुखी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्लॅस्टीक अंड्याचा विषय ताजा असताना बाजारात प्लास्टिक भेसळ तांदूळ आल्याची धक्कादायक बाब वसई-विरारमध्ये समोर आली.

 

वसईच्या वाळीव परिसरातील एका दुकानात अशा प्रकारचे तांदूळ विक्रीसाठी असल्याचा आरोप एका तरुणानं केला.

 

हे तांदूळ पाहता वसई-विरारमध्ये अन्नधान्यात भेसळ करणारे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

 

सचिन खंदारे या तरुणानं एक किलो तांदूळ विकत घेतला होता. हा तांदूळ शिजवला मात्र नेहमीप्रमाणे हा तांदूळ शिजण्यास बराच वेळ लागला.

 

त्यामुळे विकत आणलेल्या या तांदळाबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. या तांदळाचा भात खाल्यानंतर पोट दुखी सुरु झाली.

 

या तांदळावर चिकट पाणी जमा झाले. त्यानंतर तांदळाची गाठ जमा झाली. त्यामुळे या तांदळात भेसळ असल्याचा प्रकार समोर आला.

 

यासंदर्भात सचिन खंदारेंनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विशेष म्हणजे या तांदळाचा गोळा केला असता तो चेंडूसारखा उसळतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version