पिंपरी चिंचवडमध्ये लागले नामांतरासाठी फलकबाजी

पिंपरी चिंचवडमध्ये लागले नामांतरासाठी फलकबाजी

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता ऑर्नाबादचे नामांतरण झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही लागले नामांतरासाठी फलकबाजी झाल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद आणि अहमदनगरचे नामांतर करण्यात आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडच्या नामांतराच्या मागणीने जोर धरला आहे. पिंपरी चिंचवडमधील संस्थेनेच ही नामांतराची मागणी केली आहे. औरंगाबाद आणि नगरचं नामांतर सरकार करू शकतं तर मग पिंपरी चिंचवडचं का नाही? असा सवाल या संघटनेने केला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या नामांतराचा निर्णय सरकार घेणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. ऐन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका नामांतराच्या मागणीची भर पडल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहराला “जिजाऊनगर” असे नाव देण्यात यावे, अशा मागणीच्या आशयाचा फलक पिंपरी चिंचवड शहरात झळकला आहे. त्याबाबत शहरातील अनेक चौकात फलक लाऊन मोहीम सुरू करण्यात आली असून यामध्ये नागरिकांना सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात पिंपरी चिंचवड शहराच्या नामकरणाचा प्रश्न पुढे येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर शहरांची नावे बदलण्याच्या निर्णयानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नामांतरणाची मागणी पुढे येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version