नाशिकमध्ये 100 पुरुषांकडून पत्नींना जिवतंपणीच पिंडदान!

नाशिकमध्ये 100 पुरुषांकडून पत्नींना जिवतंपणीच पिंडदान!

आजपर्यंत आपण हिंदू धर्मामध्ये पूर्वजांचे पिंडदान केलं जात असल्याचं पाहिलं असेल. मात्र जिवंत व्यक्तींचं पिंडदान कधी पाहिलं आहे का? नाही ना… पण हे झालं आहे. नाशिकच्या गंगाघाट परिसरात रविवारी घटस्फोटित पुरुषांनी आपल्या घटस्फोट घेतलेल्या पत्नींचं जिवंतपणी पिंडदान केलंय. ‘वास्तव फाउंडेशन, मुंबई’ तर्फे जीवित पत्नींचे पिंडदान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

नाशिक येथे पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या गंगाघाटावर येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गंगाघाट परिसरात देश-विदेशातून अनेक जण आपल्या पूर्वजांचे पिंडदान आणि श्राद्ध घालण्यासाठी येत असतात. मात्र मुंबईतील शंभर पुरुषांनी आपल्या घटस्फोटित पत्नींचं जिवंतपणी श्राद्ध घातलं आहे. हिंदू धर्मात घटस्फोटाची मान्यता नाही. त्यामुळे घटस्फोट हा केवळ कायदेशीररीत्या नातं संपुष्टात आणतो, पण धार्मिकरीत्या नव्हे. मात्र ज्याप्रमाणे विवाह हा जसा धार्मिक विधींनुसार होतो, त्याप्रमाणेच त्यातून मुक्तताही धार्मिक विधीद्वारे मिळावी, यासाठी आपल्या घटस्फोटित पत्नींच्या पिंडदान आणि श्राद्धाचा विधी करण्यात आला. अनेकदा विविध कारणांमुळे लग्न मोडतात.

महिला घटस्फोट देऊन पुरुषांना सोडून जातात, अशावेळी अनेक पुरुषांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आणि आर्थिक ताणाला सामोरं जावं लागतं. तसंच काही प्रकरणात खोट्या आरोपांखाली तुरुंगात जावं लागतं. घटस्फोटांचा निकाल न्यायालयात कितीतरी वर्षं मिळत नाही. या पुरुषांना आपलं जीवन त्रिशंकूमध्ये अडकल्यासारखे वाटतं. या सर्वांचा विचार करता पुरूषांच्या जीवनाला चालना मिळण्यासाठी आणि विभक्त जीवनाच्या दडपणातून बाहेर येण्यासाठी आज शंभर घटस्फोटीत पुरुषांनी त्यांच्या भूतकाळातील पत्नींचं पिंडदान केलं असल्याची आयोजकांकडून सांगण्यात आलं.

का केलं जातं पिंडदान?

हिंदू धर्मात मृत नातलगांच्या श्राद्ध आणि पिंडदानाची प्रथा आहे. जे नातेवाईक बऱ्याच वर्षांपासून बेपत्ता असतात त्यांचंही पिंडदान करण्यात येतं. हे पिंडदान मृत व्यक्तीच्या मोक्षप्राप्ती करीता करण्यात येते अशी हिंदू धर्मात समज आहे. तसंच हे कार्य, पिंडदान करणाऱ्यांना त्या नात्याची समाप्ती दर्शवते. पुरूष आयोगाची स्थापना सरकारने महिलांसाठी ज्या प्रमाणे ‘महिला आयोगा’ची स्थापना केली आहे, तशाच प्रकारे पुरुषांसाठी देखील ‘पुरुष आयोग’ स्थापन करण्यात यावा आणि काही घटनांत पुरुषांची चूक नसतांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा यासाठी प्रयत्न करावे, अश्या मागण्या यावेळी या पिंडदानात सहभागी पुरुषांनी केल्या आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version