अन् दिडशेहून अधिक प्रवाशांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ खांबापासून रेल्वे रुळ 10 सेंटीमीटर लांब सरकला

अन् दिडशेहून अधिक प्रवाशांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ खांबापासून रेल्वे रुळ 10 सेंटीमीटर लांब सरकला

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या इलेक्ट्रीक खांबामुळे वर्षभरात दिडशेहून अधिक प्रवाशांचा धडकून मृत्यू झाला. 

 

या खांबाला रेल्वे रुळापासून दूर करण्यासाठी देहूरोड नागरिक वारंवार रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत होते.

 

मात्र, त्यांच्या या मागणीकडे रेल्वे प्रशासन वारंवार दुर्लक्ष केले. गेल्या आठवड्याभरात 5 प्रवाशांचा खांबाला धडकून मृत्यू झाला. 

 

पुणे रेल्वे स्थानकाचे मुख्य अधिकारी यांनी या घटनेची दखल घेत घटनास्थळी भेट दिली आणि घटनास्थळी असलेला खांब रेल्वे रुळापासून दूर करण्याचा निर्णय रेल्वे

प्रशासनाने घेतला.

 

शनिवारपासून पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड स्थानकाजवळ असलेल्या रुळांची दुरुस्ती सुरु आहे.

 

रेल्वेच्या हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीने या खांबाजवळील रेल्वे रूळ 10 सेंटीमीटर या खांबापासून दूर करण्यात आला.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version