किरकोळ वादातून गुंडांनी केले चार महिलांवर प्राणघातक हल्ले

किरकोळ वादातून गुंडांनी केले चार महिलांवर प्राणघातक हल्ले

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधून अतिशय धक्का दायक घटना समोर आली. पिंपरी-चिंचवडच्या देहूरोडमध्ये किरकोळ वादातून एका टोळक्यांनी चार महिलांवर प्राणघातक हल्ला केला असल्याच समोर आले आहे. यात महिला गंभीर जखमी झाली असून. यात दोन पुरुष ही जखमी झाले आहेत.

जखमी महिलांचे दुकान जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याना जाब विचारताच ही मारहाण केली. या महिलांना वाचवायला गेलेल्या पुरुषांना देखील या टोळक्यांनी मारहाण केलीय.

देहूरोडच्या अबूशेट रोडवरील ही रात्रीची घटना आहे. देहूरोड पोलिसांनी जखमींना आधार हॉस्पिटल केले दाखल केले आहे. या सर्व प्रकरणाचा देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version