वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कच्च्या खनिज तेलाची आयात दिवसेंदिवस वाढत असून सरकारच्या आयात बिलाचा आकडाही फुगत चालला आहे.
या खर्चाला आळा घालण्यासाठी टप्प्याटप्प्याने 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेल कारची विक्री बंद करून इलेक्ट्रिक कारची विक्री वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.
त्यामुळे 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या कार इतिहासजमा होतील, असे केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.