म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल महाग झालयं?

म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल महाग झालयं?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दरानं सत्तरी तर डिझेलच्या दरानं साठी ओलांडली.

 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर आहेत. त्याचा भार ग्राहकांना सोसावा लागत आहे. इतर राज्यांच्या तुलतेन महाराष्ट्रातल्या ग्राहकांना सर्वाधिक चढ्या भावानं पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर 

 

आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर)

मुंबई – ७९.४८, पुणे – ७९.३४, औरंगाबाद – ८०.४४, नागपूर – ७९.९६

आजचे डिझेलचे दर (प्रति लिटर)

मुंबई – ६२,३७ रुपये, पुणे- ६१.३५ रुपये, औरंगाबाद – ६३.३४, नागपूर-

६२.९०

महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल महाग का? 

– कच्च्या तेलांच्या किमती उतरल्या तरीही पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स कमी केले नाहीत

– सरकारनं पेट्रोल, डिझेल जीएसटीमधून वगळलं

– पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट, सेस, एक्साईज असे विविध कर

– पेट्रोलवर एकूण 45 रुपये तर डिझेलवर 29 रुपयांचा कर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version