जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ
कीटकनाशक फवारणीमुळे तब्बल 33 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कपाशीच्या वाणावर कीटकनाशकांची फवारणी करताना विषारी रसायनांची बाधा झाल्यानं शेतकऱ्यांचा जीव गेलाय.
यातील 23 जण यवतमाळ जिल्ह्यातील असून अकोल्यात 4, नागपुरात 3 जणांचा मृत्यू तर भंडाऱ्यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.
तर, धुळ्यातही एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.