जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पेट्रोलपंपावर पेट्रोल भरताय सावधान ! कारण तुमच्या गाडीत भरल्या जाणाऱ्या पेट्रोलची चोरी होते. पेट्रोलपंपावरील मशीनमध्ये पल्सर चीप लावून पेट्रोलची चोरी केली जात आहे. डोंबिवली आणि बदलापूरमध्ये 2 पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
डोंबिवलीतील साई पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलपंप आणि बदलापूरच्या कात्रप-बदलापूर रोडवरील एचपीसीएल पेट्रोलपंपचा यात समावेश आहे. हे दोन्ही पेट्रोलपंप सील करण्यात आले. तर पेट्रोलपंपाचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.