५.३० वाजता पवारांची पत्रकार परिषद

५.३० वाजता पवारांची पत्रकार परिषद

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडी झपाट्याने वेग धरत आहेत. त्यात शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या घोषणेनंतर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हादरला. दरम्यान शुक्रवारी झालेल्या समितीच्या निर्णयामध्ये पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला आहे. परंतु, आता ५.३० वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडी झपाट्याने वेग धरत आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा शरद पवारांनी केली होती. परंतु त्यावर सर्वांनीच नाराजीचा सूर व्यक्त केला होता. ‘साहेब निर्णय मागे घ्या’ हा एकच गदारोळ मजला होता. शरद पवारांच्या निवृत्ती गोषणेनंतर संपूर्ण पक्ष हादरन गेला होता. तसेच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी झालेल्या समितीच्या निर्णयामध्ये पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला आहे. दरम्यान, पवार निर्णय मागे घेण्याच्या निर्णयाने चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांचा चांगलाच जल्लोष पाहायला मिळत आहे. याच संदर्भात शुक्रवारी ५.३० वाजता चव्हाण सेंटरला शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत.

यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून शरद पवार या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलतायत हे महत्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version