…अन् शरद पवारांनी स्वत: कारमधून उतरुन जखमींना मदत केली

…अन् शरद पवारांनी स्वत: कारमधून उतरुन जखमींना मदत केली

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. गडचिरोली दौऱ्याच्या वेळी पवारांनी कार अपघातातील जखमींना मदत केली आहे.

शरद पवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला होता. अपघाताचं दृश्य पाहून पवार थबकले. त्यांनी स्वत: कारमधून उतरुन जखमींना मदत केली.

अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

मदतीनंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version