जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतल्या पवई तलावाच्या सुरक्षारक्षकांना अज्ञात युवकांनी मारहाण केली. ही मारहाण तेथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालीय.पवई पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध सुरू आहे. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत.
येथे मासेमारी करण्यासाठी काही जण चोरून तलावात किंवा काठावर येतात. त्यावर या सुरक्षा रक्षकांनी मासेमारी करणाऱ्यांना अटकाव केला.
याचा राग मनात धरून तोंडावर कपडा गुंडाळून 4 ते 5 जणांनी दोन सुरक्षा रक्षकांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. यावर पवई पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.