जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंवर टीकेची झोड उठत असताना, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली.
शेतकऱ्यांसाठी काढलेल्या संवाद यात्रेचं नेतृत्व दानवेच करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. दानवेंच्या वक्तव्यामुळे शेतकरी दुखावलेलाच नाही, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला
गेला, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
दरम्यान संवाद यात्रेबाबत बोलता बोलता चंद्रकांत पाटील यांनी संवाद यात्रेचा बुरखा फाडला. शिवार सभा आणि शेतकरी संवाद हा संवाद यात्रेचा एक भाग असून पक्ष विस्तारासाठी काढल्याचं
त्यांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.