जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, कॉलरा या आजारांचा फैलाव वाढला आहे.
कुर्ला, मानखुर्द, चिंचपोकळी या भागांसह पश्चिम उपनगरांमधील अनेक ठिकाणी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत्या आहेत. त्यामुळे अतिसार, कावीळ, कॉलरा या आजारांमध्ये वाढ झाली.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात मुंबईत 1010 रुग्ण अतिसाराने त्रस्त होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अतिसाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढलं.
खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अतिसाराच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये महिला, लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जातं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.