कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम काळाच्या पडद्याआड, पतंगराव कदमांच्या कारकिर्दीचा उजाळा

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम काळाच्या पडद्याआड, पतंगराव कदमांच्या कारकिर्दीचा उजाळा

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जानेवारी १९४५ ला सोनसळ, सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा जन्म झाला. पतंगराव कदम या व्यक्तिमत्त्वाने गेली चाळीस वर्षे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जीवनात प्रचंड काम उभे केले. रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असलेल्या पतंगरावांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात महिना सत्तर रुपयावर नोकरी धरली. पहाता-पहाता आज सर्वश्रेष्ठ भारती विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली. पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी निर्धाराने पाऊल उचलले आणि अनेक अडचणींवर मात करून आज १८४ संस्थांचे ते संचालक आहेत.

१९८५ ते २०१४ अशा सात विधानसभा निवडणुकीत अगोदर भिलवडी-वांगी आणि नंतर पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार म्हणून पतंगरावांच्या नावावर आहे. उद्योग, सहकार, पाटबंधारे, वन अशी अनेक खाती पतंगरावांनी यशस्वीपणे हाताळलेली आहेत. पुण्याचे हिंजवडी औद्योगिक क्षेत्र पतंगरावांच्या उद्योग कर्तृत्वाची साक्ष मानली जाते. रयत शिक्षण संस्थेचे भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या योजनेत शिक्षण घेऊन पतंगरावांनी रयतच्या मॅनेजिंग कमिटीवर आजतागायत काम केलेले आहे .

ग्रामीण जनतेचे प्रश्न सतत सोडवणारे आणि सर्वोत्तम शिक्षणाचा ध्यास धरून असणारे, पश्चिम महाराष्ट्रातला फार मोठा नेता गेल्या चाळीस वर्षात अथक परिश्रमाने आज महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील मोठे व्यक्तिमत्त्व बनलेले. डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील आहेत. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे याच्या छत्राखाली देश व परदेशामध्ये 180 शैक्षणिक संस्था असून ही भारतातील नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version