जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
शेतकरी कर्जमाफीमध्ये बँकाकडून आडकाठी घालण्यात येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी समाचार घेतला.
बँका या सरकारच्या अंडरखाली असून सरकारचा दबदबा राहिला नाही का? बँका कशी आडकाठी घालतील असा सवाल भाजपा सरकारला केला.
तसेच शेतकरी कर्जमाफीची खरी आकडेवारीबाहेर आली पाहिजे असं मत कदम यांनी व्यक्त केले. ते सांगली मध्ये बोलत होते.
शेतकरी कर्जमाफीचा 10 हजार पर्यंतचा कर्जाचा फायदा फार शेतकऱ्यांना झाला नाही. तर, पश्चिम महाराष्ट्रात पाऊसाची फार चांगली परिस्थिती नाही.
सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे वीज कनेक्शनचा प्रश्न निर्माण झाला असेही त्यांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.