पासपोर्टसाठी हिंदी भाषेतूनही ऑनलाइन अर्ज करता येणार

पासपोर्टसाठी हिंदी भाषेतूनही ऑनलाइन अर्ज करता येणार

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पासपोर्टसाठी आता नागरिकांना हिंदी भाषेतूनही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.  

 

या संदर्भात संसदीय समितीने केलेल्या शिफारशींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकतीच मंजुरी दिल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ही तरतूद लागू केली आहे.

 

संसदीय समितीने 2011 मध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये पासपोर्टसंदर्भात अनेक शिफारशी केल्या होत्या. देशातील सर्व पासपोर्ट कार्यालयांमध्ये द्विभाषिक अर्ज असावेत आणि हिंदी भाषेतून भरलेला अर्ज स्वीकारला जावा, या मुख्य

शिफारशीसह अनेक शिफारशींना राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्याचे सरकारी परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version