कोल्हापूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर खासगी आराम बसच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे. नेहमीच्या दरात सुमारे ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत वाढ केल्याने प्रवाशांना प्रवास करताना विचार करण्याची वेळ आली. एकीकडे एस. टी. महामंडळाने दिवाळीत होणारी हंगामी दरवाढ रद्द केली आहे; तर दुसरीकडे मात्र खासगी बसचालकांनी दराचा कळस गाठला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.