मुंबई– बॉलिवूड अभिनेता परवीन डबास कार अपघातात जखमी झाला आहे. नुकतीच अभिनेत्याशी संबंधित ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी अभिनेता कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. परवीनची पत्नी प्रीती झांगियानी हिन त्याच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे.
वेगवेगळया चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये दिसलेला बॉलिवूड अभिनेता परवीन डबासला कार अपघातानंतर मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत. शाहरुख खानच्या चित्रपटांमध्ये दिसलेली त्याची पत्नी प्रीती हिने त्याच्या तब्येतीचे अपडेट दिली आहे.
महत्त्वाचे मुद्दे –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.