पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतल्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन होत आहे. नव्या संसदेचं उद्घाटन अवघ्या काही तासांवर आलं आहे. पण देशाच्या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर बहिष्काराच्या बातम्या आहेतच, असं असलं तरी नव्या संसदेवरुन आणखी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु आहेत. नव्या संसदेच्या वैशिष्ट्यांवरुनही चर्चा रंगल्या आहेत. जुन्या संसदेपेक्षा जास्त खासदार बसू शकतील अशा भविष्याच्या हेतूनेच ही नवी संसद तयार करण्यात आली आहे.
नवीन संसदभवनाच्या उद्घाटन समारंभाचा संपूर्ण कार्यक्रम –
सकाळी 7.15 : PM मोदी मुख्य गेटमधून प्रवेश करतील.
सकाळी 7.15 : पूजा सुरू होईल.
सकाळी 8.30 : पूजा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी लोकसभेच्या कक्षाकडे जातील.
सकाळी 9.00 : लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ऐतिहासिक राजदंड सेंगोल स्थापित केला जाईल.
सकाळी 9.00 ते 9.30 : लॉबीमध्ये प्रार्थना सभा.
सकाळी 9.30 : PM मोदी कॅम्पस सोडतील.
सकाळी 11.30 : पाहुणे येण्यास सुरुवात होईल.
दुपारी 12 : प्रमुख पाहुण्यांचे आगमन.
दुपारी 12.10 : राष्ट्रगीतानंतर राज्यसभेचे माननीय उपसभापती यांचे स्वागत भाषण.
दुपारी 12.17 : दोन फिल्मचं स्क्रीनिंग.
दुपारी 12.29 : उपराष्ट्रपतींचा संदेश.
दुपारी 12:33 : राष्ट्रपतींचा संदेश.
दुपारी 12.38 : राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याचे अभिभाषण.
दुपारी 01.05 : स्मरणार्थी नाणे आणि स्टांप प्रकाशन.
दुपारी 01.10 : पंतप्रधान मोदींचे भाषण.
यानंतर लोकसभा महासचिव यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.