Pune Crime: 16 व्या वर्षी लग्न, अचानक उलट्या-जुलाबांनी बिघडली श्रुतीची तब्येत; आई-वडिलांच्या आरोपांनी सरकली पायाखालची जमीन

पुण्यातील कोथरूड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात हुंड्यासाठी अवघ्या 18 वर्ष्याच्या विवाहित तरुणीचा छळामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Pune Crime: 16 व्या वर्षी लग्न, अचानक उलट्या-जुलाबांनी बिघडली श्रुतीची तब्येत; आई-वडिलांच्या आरोपांनी सरकली पायाखालची जमीन

पुण्यात हुंड्यासाठी अवघ्या 18 वर्ष्याच्या विवाहित तरुणीचा छळामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 18 वर्षाच्या श्रुतीचा सासरच्यांकडून छळ करून अत्याचार केल्याचा आरोप आहे. श्रुती सुनील बनसोडे हिला हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि जेवणातून विष देऊन तिची हत्या करण्यात आली. असा आरोप तिच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर केला आहे.

श्रुती अवघ्या 16 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी तिचं 28 मार्च 2024 रोजी बुद्धभूषण गायकवाड नावाच्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं. श्रुती बनसोडे आणि बुधभूषण गायकवाड यांचे प्रेम संबंध होते, त्यामुळे बदनामीला घाबरून तिच्या आई-वडिलांनी ती अल्पवयीन असताना लग्न लावून दिलं.

हेही वाचा- Amravati Crime : घरातील व्यक्तीच ठरला नराधम! मामा कारागृहात असताना भाच्याकडून 40 वर्षीय मामीवर अत्याचार

यानंतर तिच्या सासरच्या मंडळींकडून तिला हुंड्यासाठी दररोज त्रास दिला जात होता. इतकचं नव्हे तर पोलिसात तक्रार केल्यास मुलीचे खासगी व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी मुलाच्या घरच्यांनी दिली होती. 4 तारखेला श्रुतीला उलट्या आणि जुलाबाचा प्रचंड त्रास झाला, यानंतर तिला उपचारासाठी पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र 5 मे 2026 तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दरम्यान मृत्यू झालेल्या विवाहित तरुणीच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नवरा सासू-सासरा आणि धीर यांच्याकडून या तरुणीला प्रचंड मारहाण आणि छळ केला जात होता, या तरुणीला जेवणात विष घालून मारण्यात आले असल्याचा आरोप देखील या मृत्यू झालेल्या तरुणीच्या आई-वडिलांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी मृत्यू झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version