जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
परळमध्ये महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या तळाला आग लागली. एफ साऊथ वॉर्ड ऑफिसच्या बाजूला आग ही लागली आहे.
घटनास्थळी अग्निशमक दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रणात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी क्रिस्टल टॉवर या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर आग लागली होती, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता.