परभणी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून बुधवारी एका दिवसात तब्बल ११७२ पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना विरूध्द सुरू असलेल्या या लढाईत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा आता कोरोनाची लागण झाली आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल ११२ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, तर काही जण गृहविलगीकरणात आहेत.
यामध्ये १६ अधिकारी, तर ८६ पोलिस कर्मचारी आणि १० होमगार्डचा समावेश आहे. जिल्हा पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा बुधवारी कोरोनाने मृत्यूसुद्धा झाला आहे. आतापर्यंत सहा कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.