पनामा पेपर्स नंतर आता पॅराडाईज पेपर्समध्ये भारतीयांचा समावेश

पनामा पेपर्स नंतर आता पॅराडाईज पेपर्समध्ये भारतीयांचा समावेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त अँटी ब्लॅक मनी डेसाजरा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली असतानाच पॅराडाईज पेपर्सउजेडात आलंय. पॅराडाईज पेपर्समध्ये बोगस कंपन्यांचा खुलासा करण्यात आला असून या कंपन्यांचा वापर जगातील श्रीमंत मंडळी परदेशात पैसे पाठवण्यासाठी करत होती.

पॅराडाईज पेपर्समध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे. कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर्म्युडामधील अॅपलबायया कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची 13 पूर्णांत 4 दशलक्ष कागदपत्रे उघड करण्यात आलीय. पॅराडाईज पेपर्समधील 180 देशांच्या यादीत भारत 19 व्या स्थानी आहे. नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, अमिताभ बच्चन, विजय मल्ल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version