जवानांपेक्षा राजकारण्यांची हत्या करा; पप्पू यादवांचा नक्षल्यांना वादग्रस्त सल्ला

जवानांपेक्षा राजकारण्यांची हत्या करा; पप्पू यादवांचा नक्षल्यांना वादग्रस्त सल्ला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

वादग्रस्त वक्तव्यामुळे खासदार पप्पू यादव नेहमी चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी अशाचप्रकारचे वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

नक्षलवाद्यांनी जवानांची हत्या करण्यापेक्षा राजकीय नेत्यांची हत्या करणे चांगले, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

 

नक्षलवाद्यांनी जवानांना नव्हे तर राजकीय नेत्यांना संपवले पाहिजे. जे देशाची व्यवस्था चालवत आहेत, अशा राजकीय नेत्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली पाहिजे.

 

देशातील राजकीय स्थिती खूप खराब झाली आहे. गरीब जास्त गरीब होत आहे. गरजू लोकांना न्याय मिळत नाही. उलट त्यांचे शोषण होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version