पनवेल दारूबंदी करणारे पहिले मनपा क्षेत्र

पनवेल दारूबंदी करणारे पहिले मनपा क्षेत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पनवेल महानगर पालिकेतर्फे पनवेल महापालिका क्षेत्रात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठीचा ठराव महासभेत मांडण्यात आल.

या ठरावाला सत्ताधारी आणि विरोधकांनी पाठिंबा देत दारू बंदी चा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.

अशा प्रकारे दारू बंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिली महानगर पालिका असल्याचं म्हंटलं जातय.

अंतिम निर्णयासाठी हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून यावर राज्य सरकार काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागलय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version