…म्हणून पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या 68 व्या जयंती निमित्त आयोजीत सर्व कार्यक्रम रद्द केले

…म्हणून पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या 68 व्या जयंती निमित्त आयोजीत सर्व कार्यक्रम रद्द केले

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडे आणि मुंडे कुटुंबियांनी गोपीनाथरावांच्या समाधीचे दर्शन घेतले.

 वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मात्र, तरीही त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले सामाजिक उपक्रमांचे सर्व कार्यक्रम रद्द करून, शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडेंनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याची महिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version