बीडमध्ये गरम उसाची टाकी फुटल्यानं 15 कामगार जखमी; पंकजा, प्रीतम यांच्यासह धनंजय मुंडेंनी केली रुग्णांची विचारपूस

बीडमध्ये गरम उसाची टाकी फुटल्यानं 15 कामगार जखमी; पंकजा, प्रीतम यांच्यासह धनंजय मुंडेंनी केली रुग्णांची विचारपूस

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झालाय… शुक्रवारी साखर कारखान्यात गरम उसाची टाकी फुटल्यानं 15 कामगार जखमी झाले होते… त्यापैकी 6 कामगारांची स्थिती अत्यवस्थ होती.. त्यापैकी मधुकर आदनाक, सुभाष कराड आणि गौतम घुमरेंचा मृत्यू झालाय…

महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.  

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी डॉक्टरांशी संपर्क साधून, रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, कामगारांचे जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version