जय महाराष्ट्र न्यूज, बीड
गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनानंतर मला त्यांच्या जागेवर केंद्रात मंत्रिपदाची ऑफर होती असं गुपित राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलंय.
विशेष म्हणजे बीडमधील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंकजा यांनी हे विधान केलंय.
तुमचे-माझे आधारवड असलेले मुंडे साहेब अचानक गेले, अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश शोकसागरात बुडाला होता. साहेबांचा राख सावडण्याचा दिवस होता. त्याच दिवशी मला मुंडे साहेबांच्या जागी केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.