पीए अनंत गर्जेच्या पत्नीचा धक्कादायक मृत्यू, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; निवेदनात काय?

अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने या आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळत आहे. तर, पंकजा मुंडे यांनी हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
पीए अनंत गर्जेच्या पत्नीचा धक्कादायक मृत्यू, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; निवेदनात काय?

Pankaja Munde on Gauri Garje's death : राज्याच्या पर्यावरण मंत्री (Environment Minister) पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात (Political Circle) एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या वरळी (Worli – Mumbai) येथील त्यांच्या राहत्या घरी गौरी पालवे-गर्जे यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. धक्कादायक म्हणजे, गेल्या वर्षी बीड (Beed) येथे झालेल्या अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांच्या विवाह समारंभाला पंकजा मुंडे यांनी स्वतः उपस्थिती लावली होती.

हत्येचा आरोप आणि गुन्हा दाखल
डॉ. गौरी गर्जे यांच्या वडिलांनी हा मृत्यू संशयास्पद (Suspicious Death) असल्याचा आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या (Murder) करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी (Worli Police) तातडीने कारवाई करत अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे या तिघांविरोधात 'आत्महत्येस प्रवृत्त' केल्याचा (Abetment to Suicide) गुन्हा दाखल केला आहे. काल (शनिवारी) रात्रीपासून गौरी गर्जे यांचे नातेवाईक वरळी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. त्यानंतर रविवारी (Sunday) सकाळी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा – Anant Garje Wife Death: 'माझ्याकडे पूर्ण ब्रिफिंग…'; गौरी गर्जेच्या मृत्यूवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण
अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने या आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळत आहे, ज्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, पंकजा मुंडे यांच्या कार्यालयातून (Pankaja Munde's Office) एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. घटनेनंतर वरळी पोलिसांनी काल संध्याकाळी डॉ. गौरी पालवे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो केईएम रुग्णालयात (KEM Hospital) शवविच्छेदनासाठी (Post Mortem) पाठवला होता. तपासाअंती सत्य काय आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

पंकजा मुंडे यांच्या निवेदनात काय म्हटलंय?
काल दिनांक 22  नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी  6.30 ते 6.45 वा. सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीए च्या फोनवर आला. तो खूप रडत होता पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे. तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. 

गौरीच्या वडिलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे.

हेही वाचा – 'माझी लेक…' डॉक्टर गौरी पालवेच्या मृत्यूनंतर वडिलांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले अशोक पालवे?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version