भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली.
तर पंकजा मुंडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले. गौरी गर्जेच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशातच गौरीची आत्महत्या नाही तर तिला मारल आहे. तिच्या शरिरावर गंभीर जखमा होत्या. एसआयटी स्थापन करुन गौरीला न्याय द्यावा अशी मागणी गौरीच्या आई वडिलांनी केली आहे.
यावेळ गौरीचे वडील म्हणाले की, “दोनच नाही जे-जे कोणी सत्तेत असतील विरोधी पक्षातील असतील त्यांना मुली आहेत ना साहेब. एकच मला मुलगी आहे का एवढी कोणीही असतील सत्तेतले किंवा विरोधी पक्षातले मला न्याय द्याय आमच्या मुलीला न्याय द्या. 2021 ला मी त्याचा एका मुलीसोबत रिपोर्ट देखील शेअर केला होता”.
“मला माझ्या मुलीने सांगुन ठेवलं होत की, बाबा कोणाला सांगू नका. आपल्या धर्मात मुलगी एकदा दिली म्हणजे दिली. तिने आम्हाला दडपण दिल की, पप्पा माझा संसार उद्वस्थ होईल. आनंदने सांगितल की, मी आत्महत्या करेन नाही तर तुला मारेन”. म्हणून मग त्या धाकामुळे आम्ही कोणाला काय सांगितल नाही”.
“मी जर एखादा गुन्हा केला तर त्याचा कागद मी माझ्या पत्नीला दाखवायला ठेवेन का? याचा अर्थ त्याला तिला त्रास द्यायचा होता. माझ्या मुलीला त्याने मारलं माझी मुलगी एवढी खंबीर होती की, ती आत्महत्या करणार नाही. माझ्या मुलीच्या हाती असे रिपोर्ट लागले ज्यात आंबेजोगाईच्या एका मुलीच्या गर्भपाताची माहिती होती आणि त्यात आनंद गर्जे हा पती म्हणून लिहलेल होत”, असं त्यांनी सांगितल आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.