जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानभवनात अंगणवाडी सेविकांचा प्रश्न उपस्थित करत सरकारवर ताशेरे ओढलेत. अंगणवाडी सेविकांना सर्व सुविधा द्या अन्यथा लागू करण्यात आलेला मेस्मा हटवा, असं ते म्हणालेत.
दरम्यान त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. कुपोषण, बालमृत्यू रोखण्यासाठी मेस्मा लावला जातोय. सफाई कामगार, हॉस्पिटल या ठिकाणीदेखील मेस्मा लावला जातो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.