जय महाराष्ट्र न्यूज, बीड
भगवान गडाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी द्या अशी मागणी पंकजा मुंडे यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्याकडे केली.
तशी विनंती करणारं पत्र त्यांनी महंताना पाठवले आहे. भगवान गडावर दसरा मेळाव्याला 20 मिनिटं भाषण करण्याची परवानगी द्या असं त्यांनी या पत्रात म्हटल आहे.
दसरा मेळाव्याच्या भाषणाला महंत नामदेवशास्त्री यांनीही विरोध केला होता. त्यानंतर मग गडाच्या पायथ्याच्या ग्रामस्थांनीही विरोध करणाऱ्या मागणीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं होते.
आता या पंकजा मुंडेंच्या विनंतीला महंत कसा प्रतिसाद देतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.