जय महाराष्ट्र न्यूज, बीड
परळी बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंडे भाऊ-बहीण आमने-सामने आले. अत्यंत छोट्याशा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लागली.
गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला.
परळी नगरपालिका ताब्यात ठेवण्यात धनंजय मुंडेंना यश मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या. परळी बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले. अखेर धनंजय मुंडेंनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.