पाच हजार रुपयांमध्ये घर चालवून दाखवा; मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेंना ‘त्यांचे’ आव्हान

पाच हजार रुपयांमध्ये घर चालवून दाखवा; मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेंना ‘त्यांचे’ आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पाच हजार रुपयांमध्ये घर चालवून दाखवा असं आव्हान अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दिले आहे.

 

दरम्यान, संप मागे घेतल्याशिवाय चर्चा नाही. ही सरकारची भूमिका मुजोरपणाची असून, थोडे तरी ‘पारदर्शक’ वागा असा टोलाही समितीच्या शोभा शमीम यांनी लगावला.

 

तसचं मागण्या मान्य केल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याच स्पष्ट केले आणि 73 लाख अंगणवाडी बालकांना पोषण आहार न मिळण्यास सरकारचं सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप कृती समितीने सरकारवर केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version