गणेशोत्सव म्हंटल की अनेक गणेश मंडळात विविध गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तसेच विविध सजावटीही केल्या जातात, अशीच एक गणेशमूर्ती पुण्यात पाहायला मिळाली आहे.
पुण्यातील गणेशनगर भागातील गणेश भेळ यांनी चक्क पाणीपुरीचा बाप्पा साकारलेला आहे.
जवळजवळ 10 हजार पुऱ्या वापरून हा गणेश बाप्पा साकारण्यात आला आहे.
प्रशांत साळुंखे यांनी 3 कारागिरासह पंधरा दिवसात बाप्पांची ही मूर्ती साकारली आहे.
यामध्ये गणपती बाप्पा स्वतः भेळ करून ग्राहकांना देत आहेत अशी या मूर्तीची संकल्पना बांधण्यात आलेली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.