परफेक्टनिस्टचा नगर दौरा

परफेक्टनिस्टचा नगर दौरा

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

परफेक्टनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी किरणराव यांनी आज आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. आमीरने यावेळी तिथल्या कामाची पाहणी केली. तसंच परिसरात फेरफटकादेखील मारला इतकंच नाही तर, डोंगरावर असलेल्या हात पंपावर आमीरने पाणी उपसले. अामीर खान आणि किरणराव सध्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमानिमित्त नगर जिल्ह्यात दाखल झालेत.

यावेळी आमीरने गावाची पाहणी करत वृक्षरोपणही केलं. आमीरने ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं. या पद्धतीने काम सुरु राहिल्यास राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल. याचा राज्याला आणि पुढच्या पिढीलाही फायदा होणार असल्याचं आमिरने सांगितले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version