सायकलस्वारांची पंढरपूर वारी

सायकलस्वारांची पंढरपूर वारी

टाळ मृदूंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या जयघोषात एकीकडे राज्यभरातले वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे नाशिकमधून दरवर्षीप्रमाणे सायकस्वार पंढरपूरकडे जाण्यास निघाले आहेत. नाशिक सायकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सायकल वारी करण्यात येते. यंदाचे सायकल वारीचे हे अकरावे वर्ष आहे. यंदा साधारण ३०० सायकस्वार या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. दोन दिवसांचा मुक्काम करून हे सायकलिस्ट पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान फक्त विठू माऊलीच दर्शन घेणच नाही तर पर्यावरणाचा संदेश देणं हा देखील या वारीचा उद्देश असल्याचे सांगितले जाते आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version