जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजाऱ्यानं भाविकाला मारहाण केली.
अशोक भणगेनं दत्तात्रे सुशे या भाविकाला मारले. दत्तात्रे सुशे हे नगरच्या शेवगावातले रहिवाशी आहेत.
विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी ते पंढरपुरात आले होते. देवाला हार घालण्याच्या कारणावरून पुजारी अशोक भणगेनं त्यांना मारहाण केली.
त्याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान भणगेविरोधात याआधीही अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.