द्राक्षांची बाग काढून वडिलांनी मुलासाठी बनवले क्रिकेटचे मैदान

द्राक्षांची बाग काढून वडिलांनी मुलासाठी बनवले क्रिकेटचे मैदान

पंढरपूर: कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने राज्यात टाळेबंदी लागू केली आहे. पंढरपुरात टाळेबंदीमुळे मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी एका वडिलांनी आपल्या शेतातील ५ एकर जागेतील द्राक्षांची बाग काढून तेथे राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान बनवले आहे.

पंढरपुरमधील ठेकेदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी अनवली येथील आपल्या शेतात हे मैदान बनवले आहे. सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश याला क्रिकेटची खूप आवड आहे . गेल्या चार वर्षांपासून तो क्रिकेट खेळतो आहे . कोल्हापूर येथील पेठ वडगाव येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा अभियश तेथेच क्रिकेट क्लब मधून कोच इम्रान पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तासनतास सराव करीत होता.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट सुरु झाल्याने त्याला पुन्हा गावी परत यावे लागले . इथे आल्यावर क्रिकेट खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने त्याच्या खेळात खंड पडू लागला आणि यशने आपल्या वडिलांकडे पुन्हा क्रिकेट खेळपट्टीबाबत हट्ट धरला. त्यामुळे बाळासाहेब यांनी त्यांच्या शेतातील ५ एकर जागेतील द्राक्षांची बाग काढून तेथे राष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी बनवायला सुरुवात केली. तसेच मुंबई येथून खेळपट्टी आणि मैदानावर लावायचे गवत आणून ते लावण्याचे काम सुरु केले.

सूर्यवंशी यांच्या मैदानावर सध्या ४ राष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्या, २ सराव खेळपट्ट्या आणि दोन सिमेंट खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. येथे मजुरांकडून गवताचे लॉन तयार करण्याचे काम सुरु असून येत्या दोन महिन्यात हे मैदान तयार होणार आहे . मुंबई येथील वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटर महामुणकर यांनी थेट अनवली येथे येऊन या खेळपट्टीची पाहणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version