बिअर शॉपचा शटर तोडून चोरट्यांचा डल्ला

बिअर शॉपचा शटर तोडून चोरट्यांचा डल्ला

पालघर : येथील वाणगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाणगाव येथील बिअर शॉपचा शटर तोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरांनी रोखेसह दारु चोरली आहे.

वाणगाव रेल्वे फाटकाजवळ हे विजय बिअर शॉप आहे. रात्री या 3 चोरट्यांनी बिअर शॉपचा शटर तोडून दुकानात प्रवेश केला. यावेळी या चोरट्यांनी रोखीसह 3 बिअर देखील चोरी केल्या. ही सर्व घटना 9 डिसेंबरच्या मध्यरात्री 3. 50 दरम्यान घडली.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हे चोर बाईक वरुन आले होते. दरम्यान या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version