जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
महाराष्ट्र सरकार स्मार्ट सिटी आणि स्मार्ट खेडी घडविण्याकडे वाटचाल करत आहे, शहरातली मुलं डिजिटल शिक्षण घेतायत पण याच महाराष्ट्रातलं एक दाहक वास्तव म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्याच पालघरमधील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी भर उकाड्यात पंख्याशिवाय शिक्षण घेत आहे. जिल्ह्यातल्या शेकडो शाळापर्यत वीज अजुन पोहोचली नाही. भर उन्हाळ्यात या शाळा भट्ट्या झाल्यात.
आदिवासी पाड्यातील नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नाही. त्यांना गरजेच्या गोष्टी उपल्धन नसतात. अशा परिस्थितीत ते आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असतात. अशातच त्यांच्या मुलांनादेखील काही सोयीसोविधा अपुऱ्या पडतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.