विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये तुफान हाणामारी; मारामारीत चावून एकाचा अंगठा तोडला

विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये तुफान हाणामारी; मारामारीत चावून एकाचा अंगठा तोडला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळाले. या मारामारीत अंगठा तुटल्यामुळे एक युवक जखमी झालाय.

बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडलीये. पश्चिम रेल्वेवरील विरार स्टेशनवर विरार-डहाणू पॅसेंजर उभी होती. त्यावेळी आपापसातील वादातून भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली.

मारामारीत चावून एकाचा अंगठा तोडण्यात आला. मारामारी करणारे युवक केळवेमध्ये राहणार  आहेत. इतकी मोठी घटना होऊनही रेल्वेच्या पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version