जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
पालघर जिल्ह्यात 4 दिवसापासून पूर परिस्थिती असताना आपतकालीन 24 तास ही सेवा बोर्ड लावून बंद ठेवण्यात आली. त्यामुळे विक्रमगड आपतकालीन व्यवस्थापनवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली.
दोन दिवसापूर्वी विक्रमगडमधील तांबाडी नदीला पूर आला असताना लाकूड मिळविण्याकरिता गेलेला तरुण नदीच्यामध्ये अडकले होता. मात्र, यावेळी आपतकालीन कक्षाकड़ून त्याला वाचविण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नसून कार्यालयाला टाळं होतं. या मुद्दावर नारनवरे यांनी याबाबतची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे आश्वसन दिलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.