जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
पालघर जिल्ह्यात 3 आसनी आणि 6 आसनी रिक्षा चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे. अत्यंत खर्चिक, त्रासदायक ठरणारे कल्याण हे ठिकाण बदलून पुन्हा ती पालघरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो रिक्षाधारकांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर मुख्यालयात सुरू करणे गरजेचे असताना ते विरार येथे सुरू करण्यात आले. परिवहन विभागाने ही आपल्याला पालघर मुख्यालयात कार्यालय आणि इतर पासिंग चाचणीच्या प्रक्रियेसाठी जागेची मागणीच केली नसल्याने शासन पातळी वरून त्याबाबत विचार करण्यात आलेला नसल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.