पाकिस्तानी अभिनेत्री मोदींवर नाराज

पाकिस्तानी अभिनेत्री मोदींवर नाराज

पाकिस्तान, १० मे २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानमध्ये सध्या वातावरण बरेच तापले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्याने सध्या सर्वत्र याच प्रकारांची चर्चा सुरु आहे. दरम्यान एका पाकिस्तानी अभिनेत्रींचे ट्विट समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. या पाकिस्तानी अभिनेत्रीने आपल्या ट्विटच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान आणि भारतातील ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेवर निशाणा साधला आहे.

सहार शिनवारी नामक एका पाकिस्तानी अभिनेत्रीने अलीकडेच एक ट्विट केले आहे. यात तिने लिहिले,”दिल्ली पोलिसांची ऑनलाइन लिंक कोणाला ठाऊक आहे का? माझ्या पाकिस्तान या देशात अराजकता आणि दहशतवाद पसरवणारे भारताचे पंतप्रधान आणि भारतीय गुप्तचर एजन्सी रॉ यांच्या विरोधात मला तक्रार दाखल करायची आहे. मला खात्री आहे की, भारतीय सर्वोच्च न्यायालय मला नक्की न्याय देतील.”

अभिनेत्रींच्या या ट्विटवर दिल्ली पोलिसांनी चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. दिल्ली पोलिस म्हणाले,” आम्हाला पाकिस्तानमध्ये अधिकार क्षेत्र नाही. पण तुमच्या देशात इंटरनेट बंद असताना तुम्ही कसे ट्विट करत आहात? हे जाणून घ्यायला आवडेल!” आता या ट्विट सध्या देशभर चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version