वृत्तसंस्था, पणजी
बँक आणि मोबाइलला आधार कार्ड लिंक करणं आवश्यक असल्याचं आपण जाणतोच आहोत. पण ‘पेड सेक्स’साठीही आधार कार्ड आवश्यक असल्याचं सांगितलं जातंय.
गोव्यात पेड सेक्ससाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. गोव्यात गेलेल्या पाच तरुणांना आलेल्या अनुभवानंतर हा प्रकार उघडकीस आलाय.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पाच तरुण गोव्यात बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले होते. तेथे त्यांनी एका दलालाशी संपर्क साधून आपल्यासाठी कॉलगर्लची मागणी केली.
हे पाचही तरुण उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. येथे त्या दलालाने त्यांना फोन करून मुलींची सोय झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दलालाने पुन्हा फोन करून आधार कार्डची मागणी केली.
गोव्यात जोरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर लगाम घालण्यासाठी गोवा पोलीस प्रयत्नशीलयेत. त्यामुळेच गोव्यातील एजंट आणि दलाल यांच्याकडून सावधगिरी बाळगण्यात येतेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.