कॉंग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेनंतर चिंदबरम यांना घरातून अटक

कॉंग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेनंतर चिंदबरम यांना घरातून अटक

अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर INX मीडिया प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. बेपत्ता झालेल्या चदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच तेथे CBI त्यांना अटक करायला पोहोचली. मात्र तोपर्यंत ते घरी रवाना झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अखेर अटक करण्यात आली.

कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी नवी दिल्ली येथील कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर लावलेल्या सर्व आरोप फेटाळले आहे. INX मीडिया प्रकरणी भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. मी लपत नव्हतो तर वकिलांसोबत मिळून न्यायालयात लढण्याची तयारी करत असल्याचं पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले पी. चिदंबरम ?

यावेळी चिदंबरम म्हणाले, मी लपत नसून वकिलांसोबत न्यायालयात लढण्यासाठी तयारी करत असल्याचे म्हटलं.

गेल्या 24 तासांपासून अनेक गोष्टी घडल्यामुळे गैरसमज दूर करण्यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

INX मीडिया प्रकरणी मी किंवा माझ्या कुटुंबीयांवर कोणताही आरोप नाही.

तसेच ईडीकडून आणि सीबीआयकडून चार्जशीट दाखल केलेले नसल्याचे म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version