‘तीन लाख नोकऱ्या देण्याचं आमचं टार्गेट’

‘तीन लाख नोकऱ्या देण्याचं आमचं टार्गेट’

गुरुवारी (दि. ८ मे) मुंबईत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थीत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पुढील काळात तब्बल ३ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आमचं टार्गेट’ असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.

सध्याच्या काळात अनेक देशांची आर्थिक व्यवस्था ढासळत असताना आपण जी २० चं अध्यक्ष पद भूषवतो आहोत. देशाचं भविष्य याच युवा पिढीच्या हाती आहे. राज्याच्या प्रत्येकाला रोजगार या योजनेअंतर्गत अनेक शिबीरे भरवली जात आहेत. जास्तीत जास्त युवकांना याचा कसा फायदा होईल याकडे सरकारचं लक्ष आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

३ लाख विद्यार्थ्यांना मिळणार नोकऱ्या
आगामि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशात जे पी नड्डा हे देखील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून ३ लाख विद्याथ्यांना रोजगार मिळाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, ७५ हजार नोकऱ्या एकाच वेळी देण्याचं काम सरकार करत आहे. २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम झालं आहे. जून महिन्यात उद्योजकांना आम्ही भेटणार आहेत. पुढे 3 लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं आमचं टार्गेट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version